Breaking News
परतूर तालुका

आष्टीत आणखी 7 कोरोना पॉझिटीव्ह ;एकूण संख्या 29 वर पोहोचली

शुक्रवारी घेण्यात आलेल्या 50 जणांची अँटीजन टेस्ट मध्ये 1 पॉझिटीव्ह
आष्टी प्रतिनिधी :- आष्टी ता परतुर येथे दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत भर पडत असुन गुरुवारी रात्री आणखी 6 जनांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले तर दिनांक 14 रोजी आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाच्या वतीने येथील नागरिकांची करण्यात आलेल्या 50 अँटीजन टेस्ट मध्ये 49 जनांचे अहवाल निगेटीव्ह तर एकाच अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले असून आज पर्यंत अष्टीतील रुग्ण संख्या 29 वर पोहचली असून त्या पैकी 13 जण कोरोना मुक्त झाले आहेत


आष्टी येथे 10 ऑगस्ट रोजी सापडलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील 6 जनांचे अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटीव्ह आले तर आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी करण्यात आलेल्या 50 अँटीजन टेस्ट मध्ये 1 जणाचा अहवाल पॉझिटीव्ह तर 49 जनांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ एस.एस.पाईकराव यांनी सांगितले आतापर्यंत आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 83 अँटीजन टेस्ट करण्यात आल्या असून त्या पैक 79 निगेटीव्ह तर 4 जण पॉझिटीव्ह आले आहेत

दरम्यान आष्टीत दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतना देखील बाजारपेठेत सामाजिक अंतर हरवले असून व्यापारी असो की नागरिक कोरोना रुग्ण वाढत असल्याचे गांभीर्या कोणीच घेत नसून पोलीस यंत्रणा देखील त्या प्रमाणात सजग दिसत नसून सध्या पोळा,गणपती, महालक्ष्मी चा सण तोंडावर आल्याने बाजारपेठ मध्ये सर्वत्र गर्दी वाढलेली असून कोरोना रोगाची जणू काही भीतीच राहिली नसल्याचे चित्र सर्वत्र दिसुन येत असुन या गर्दीवर काही उपाय योजना नाही

केल्यास रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारत येत नाही दरम्यान गेल्या काही दिवसा पूर्वी आष्टीचे ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे व सपोनी सुभाष सानप यांनी गावात अचानक फिरून सामाजिक अंतर नसणे ,मास्क नसणे आदी बाबी वरून आष्टी पोलीस व ग्रामपंचायत ने संयुक्त कार्यवाही एकदा केली व हि कार्यवाही नियमित सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र आज घडीला कार्यवाही मात्र हवेत विरल्याचे होणाऱ्या गर्दी वरून दिसुन येत असुन प्रशासनाने आता रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर कठोर भूमिका घेण्याची गरज आज घडीला निर्माण झाली हे मात्र खरे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक