नागपुर

पशुवैद्यक विद्यार्थ्यांच्या आंतरवासिता मानधनात वाढ-कृषी राज्यमंत्री डॉ . संजीवकुमार बलयान

बबनराव वाघ, उपसंपादक : पशुवैद्यक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ७ हजार रुपये आंतरवासिता मानधन ( इन्टर्नशीप अलाउन्स ) दिले जाते . मात्र , यापुढे ते १५ हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ . संजीवकुमार बलयान यांनी केली .

नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते . पशुवैद्यक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून आंतरवासिता भत्ता वाढवून देण्याची मागणी होती . ही मानधनाची रक्कम ५० टक्के आयसीआर आणि ५० टक्के राज्य सरकार देणार आहे .

याचबरोबर देशभरातील पशुपालकांसाठी सिरम ह्युमन टेक्नॉलॉजी आणि वर्षातून एकदा लसीकरण या योजनाही लवकरच सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले . पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या विकासासाठी भारतीय पशुवैद्यकीय

परिषदेने विविध प्रकल्पासंदर्भात ३६ कोटी रुपयांची मागणी केली आहे . केंद्र सरकार पशुवैद्यकांसाठी आणि जनावरांसाठी पैसा कमी पडू देणार नाही . ज्या योजना अंमलात आणल्या जातील त्या पूर्ण केल्या जातील . पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविण्याच्या मागणीचा विचार करण्यात आला असून महाराष्ट्रात ५ पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे आणि लवकरच दोन नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती केली जाणार असल्याचेही बलयान यांनी सांगितले . सध्याच्या महाविद्यालयांचा विकास करून तेथे अत्याधुनिक सोयी सुविधांसह विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण कसे देण्याच्या दृष्टीने केंद्राच्या वतीने निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे .

यंदाच्या अर्थसंकल्पात डेअरी विकासासाठी ८५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे . पशुधनासाठी निधीची स्वतंत्र व्यवस्था केली आहे . राज्यातील अनेक भागात दुष्काळ परिस्थिती असताना त्यावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना साय करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करीत असल्याचेही बलियान म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक