Breaking News
परतूर तालुका

परतुर रेल्वे स्टेशन येथे 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

दीपक हिवाळे / परतुर न्यूज नेटवर्क दि १५
परतुर रेल्वे स्टेशन येथे 74 वा स्वातंत्र्य दिन प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला, पावसाची संततधार चालू असताना देखील अत्यंत हर्षउल्हासात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला, रेल्वे स्टेशन अधीक्षक राजेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते झेंडावंदन करून झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत घेण्यात आले, यावेळी बोलताना स्टेशन अधीक्षक म्हणाले की आज आपला देश प्रचंड संकटांना सामोरे जात आहे आपल्या देशाला कोरोना या महाभयंकर रोगाने वेढा घातला आहे

परंतु त्याला घाबरून न जाता त्याचा सामना करा सैनिटायझरचा वापर करा व या महाभयंकर रोगापासून आपल्या परिवाराला वाचवा गरज असेल तरच घराबाहेर पडा,कोरोना या महाभयंकर रोगामुळे खूप लोकांची नोकरी गेली आहे अश्या लोकांसोबत आपण सर्वजण राहुया त्याना सहकार्य करूया, या संकटाच्या वेळी आपण सर्व भारत सरकार सोबत राहावे, आम्ही सर्व संविधाना सोबत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां सोबत आहोत असे गुप्ता म्हणाले, यावेळी रेल्वे स्टेशन मास्टर विनय कुमार गुप्ता, अंकुर चौधरी, भूषण तांबे रेल्वे पोलिस दलाचे विजय बोराडे, राजेश उबाळे, मेघराज पाटील, अखिल शेख,पत्रकार अशोक ठोके, झूँगाराम साळवे काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष मोहन गायकवाड तसेच रेल्वेचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक