Breaking News
जाफराबाद तालुका

जाफराबाद तालुक्यात तलाठी याचे कामकाज चक्क तहसीलकार्यलयातून

माहोरा : रामेश्वर शेळके दि १६

जाफराबाद तालुक्यात सध्या पीककर्ज वाटप चालु आहे पीककर्ज साठी लागणारे सर्व दस्तऐवज हे तलाठी कार्यलयातून घ्यावे लागतात परंतु तलाठी स्वतः कार्यालयात उपस्थित न राहता तहसिल कार्यालयात कधी कधी येत असल्याने शेतकरी वर्ग पुरता वैतागला आहे यामुळे तलाठी याचे सर्व कामकाज हे तहसिल कार्यालयातून चालू आहे. याकडे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शेतकरी कर्ज माफी योजना चालु असल्यामुळे तलाठी कार्यालयातुन विविध योजनांच्या लाभार्थ्यांना फेरफार, चतु सीमा दाखले, उत्पन्नाचे दाखले आदींची तातडीची गरज असते परंतु कार्यालयीन वेळेत उघडी मिळत नाही तर काही कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी गजबजलेली आहे .


बहुतांश तलाठी सज्जे चक्क कुलूपबंद आढळून आले. त्या परिसरात आपले काम होईल, या आशेने आलेले शेतकरी, नागरिक, विद्यार्थी येऊन कार्यालय बंद असल्याचे त्याची गैरसोय होत आहे दरम्यान तलाठी कार्यालये उघडी असली तरी काही कार्यालयात तलाठी जागेवर नसून तलाठी कार्यलयातील कर्मचारी तेथे येणार्‍या नागरिकांना तलाठय़ाने आधीच सहय़ा करुन ठेवलेले दाखले देऊन अतिरिक्त पसे घेत आहेत.असा ही आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.

जाफ्राबाद तालुक्यात अनेक ठिकाणी तलाठय़ांची कार्यालयेच नसून तलाठय़ांच्या शहरातील घरातूनच कारभार चालत असल्याचे चित्र जाफ्राबाद तालुक्यात दिसत आहे

कारवाई करण्यात येईल -जिल्हाधिकारी

तलाठी सज्जावर गैरहजर राहणाऱ्या तलाठी बाबत लेखी तक्रार आल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी न्यूज जालना शी बोलताना सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक