Breaking News
मंठा तालुका

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथ्रूड तांडा शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.

सिंधीकाळेगाव प्रतिनिधी (शाम गिराम)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथ्रूड तांडा केंद्र सावंगी तलान येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मा.गटशिक्षणाधिकारी श्रीमती गीता नाकाडे व केंद्रप्रमुख फयाज शेख,भागवत जेटेवाड,केंद्रीय मुख्याध्यापक संभाजी उस्तूर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सहकार्याच्या भावनेतून शालेय मुलांना शैक्षणिक वाचन लेखनाच्या साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.शोषल डिस्टन्स चे पालन करून व महत्वाची खबरदारी घेऊन अल्प संख्येने गावकरी सहभागी झाले.या वेळी शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य विनोद राठोड,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष राठोड,लक्ष्मण राठोड,विक्रम राठोड,सहशिक्षक सतीश श्रीखंडे व मुख्याध्यापक नारायण माहोरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक