जालना तालुका

जैतापूर अंतरवाला रस्त्याची दुरावस्था:खड्यात गेला रस्ता

जालना/तुकाराम राठोड दि १५

जालना तालुक्यातील जैतापूर ते जैतापुर फाटा हा एक किलोमीटरचा रस्ता असून या रस्त्याची फार दयनीय अवस्था झाली आहे मागील दोन वर्षांपूर्वी या रस्त्याची अवस्था अतिशय समाधानकारक होती पण जैतापूर ते अंतरवाला हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून काम चालू असल्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहने ये जा करीत असताना बऱ्याच ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे

त्यामुळे गावातील नागरिकांना ये जा करायला त्रास होत आहे त्यामुळे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच समजून येत नाही तसेच शासन प्रशासनाने व अंतरवाला व जैतापूर हा रस्ता करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने जागोजागी फुटलेल्या रस्त्याची डागडुजी करून किंवा देखभाल दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत करावा ही विनंती करण्यात येत आहे नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुदाम गायकवाड व गावातील नागरिकांनी न्यूज जालना प्रतिनिधी शी बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक