Breaking News
भोकरदन तालुका

भोकरदन शहरात ठिक ठिकाणी स्वातंञ्य दिन उत्साहात

मधुकर सहाने : भोकरदन दि १५

प्रियदर्शनी इंदिरा गांधी विद्यालय भोकरदन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोशल डिस्टंसिंग वापरून शासकीय नियमानुसार संस्थेचे अध्यक्ष संतोषराव दसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजना गोरे, पोलिस पाटील साळुबा लोखंडे ,श्रीकांत दसपुते, संजयसिंग खंडाळकर उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संतोषराव दसपुते यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाविषयी मनोगत व्यक्त केले.

जनविकास शिक्षण संस्था भोकरदन

भोकरदन येथे जनविकास शिक्षण संस्था, भोकरदन संचलित श्री.गणपती इंग्लिश/मराठी विद्यालय, भोकरदन, पायोनियर इंटरनॅशनल सी.बी.एस.ई स्कूल, जोमाळा, स्व.अॅड.भाऊसाहेब देशमुख मराठी विद्यालय, जोमाळा ता.भोकरदन येथे स्वातंत्र दिन निमित्त संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभमीवर मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जि.प.जालना यांच्या आदेशानुसार पाच व्यक्तीमध्ये मास्क व सोशल डिस्टनसेस नियामाचे पालन करुन भारताचा स्वातंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, रमेश जाधव, मुख्याधापक, पि.बी.रोजेकर, सोपान सपकाळ जि.व्ही.जाधव उपस्थित होते.

भोकरदन येथे जनविकास शिक्षण संस्था, भोकरदन संचलित श्री.गणपती इंग्लिश/मराठी विद्यालय, भोकरदन, पायोनियर इंटरनॅशनल सी.बी.एस.ई स्कूल, जोमाळा येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करतांनी संस्था अध्यक्ष राजाभाऊ देशमुख सह अदि.

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भोकरदन
भोकरदन शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाविद्यालयात ७४ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रमुख अतिथी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. एस. एस. गोरे यांच्या हस्ते भारतमातेच्या व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुण ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी एस. डब्ल्यु. गायके यांची प्रमुख उपस्थिती लाभली व महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. पी. शेळके, प्रा. आर. एस. मिसाळ, प्रा. एच. व्ही. नागरगोजे, एस. एम. तळेकर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ध्वजारोहन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डाॅ.एस.एस.गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक