भोकरदन तालुका

भोकरदन किराणा असोसिएशनची अध्यक्षपदी जितेंद्र बाकलीवाल तर उपाध्यक्षपदी मुजीब खान

मधुकर सहाने : भोकरदन

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता भोकरदन शहर मागील काही महिन्यात २ ते ३ वेळा जनता कर्फ्यू करण्यात आला परंतु किराणा दुकाने जीवनावश्यक मध्ये येतात,मागील काही काळात बंद मुळे शहरात बराच राजकरण पाहायला मिळाले परंतु यामुळे दुकानदार संभ्रमात पडत असून त्यांच्यावर आर्थिक फटका सुद्धा बसत आहे व दुकानात असलेला माल सुद्घा खराब होत आहे त्यावरून आता पोळा सन तोंडावर आहे अश्यात नारळ दुकानदारानी आणून ठेवले आहे परंतु ५ दिवसाच्या कर्फ्यू मुळे हा माल असाच पडून आहे.

याच पार्श्वभूमीवर भोकरदन किराणा असोसिएशन कार्यकारणी जाहिर करुण अध्यक्षपदी जितेंद्र बाकलीवाल व उपाध्यक्षपदी मुजीब खान यांची सर्वानुमाते निवड करण्यात आली व या ५ दिवसाचा जनता कर्फ्यू या वेळेस पाळून,येणाऱ्या पुढील काळात असोसिएशन बैठक घेऊनच योग्य तो निर्णय घेईल असे ठरवण्यात आले व या असोसिएशन मध्ये शहरातील सर्व लहान ते मोठे किराणा व्यापारी सहभागी होतील आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी बैठक घेण्यात येईल ही बैठक सोशल डिस्टेंस ठेऊन घेण्यात आली या वेळी ज्ञानेश्वर नवल,मयुर बाकलीवाल, अक्षय पिसे, सुधाकर इंगळे, त्रयंबक रोकड़े,विशाल लोहाडे,प्रदीप पांडे,अनीस खान,सचिन पिसे,प्रकाश सपकाळ,ज्ञानेश्वर शेळके, स्वप्निल जैन,संतोष इंगळे, फरमान आदिंची उपस्थिति होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक