परतूर तालुका

रविंद्र वनवे गुणवंत कामगार पुरस्कार व प्राशिस्त पत्रकाने सन्मानित

विज वितरण कंपनीतर्फे गुणवंत कामगारांचा पुरस्कार व पदक देऊन सत्कार


दीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क दि १५
जालना मंडळ अधीक्षक अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते 2019 – 20 या वर्षामध्ये विज कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केल्या बद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. जालना येथे जालना मंडळ अधीक्षक अभियंता कैलास हुमने यांच्या उपस्थितीत कामगारांना प्रशस्तीपत्र व पदक देऊन गुणगौरव करण्यात आला.

गुणवंत म्हणून जालना जिल्ह्यातून एकूण 12 लोकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी परतूर उपविभागातून आष्टी शाखेमध्ये कार्यरत असलेले रवींद्र शिवाजीराव वनवे (प्रधान तंत्रज्ञ) यांची निवड करण्यात आली. याबद्दल देवकर ( कार्यकारी अभियंता परतूर ), रामटेके (सहाय्यक अभियंता परतूर), सानप ( साहाय्यक अभियंता ) व श्रीकृष्ण मित्र मंडळ परतूरच्या वतीने गुणवंत कामगारांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक