घनसावंगी तालुका

घनसावंगी गटविकास अधिकाऱ्यांच्या त्या आदेशाला ग्रामसेवकांकडून केराची टोपली

जांब समर्थ / कुलदीप पवार दि १५

घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील
दिव्यांग लाभार्थ्यांची निधी वाटप करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्र देऊनही महिना भराचा कालावधी उलटला तरीही ग्राम पंचायत ने मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

घनसावंगी तालुक्यातील दिव्यांग बांधवाचा सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ या वर्षाचा दिव्यांगाचा ५% निधी तात्काळ खर्च करण्यात यावा, असे तत्कालीन घनसावंगी चे गटविकास अधिकारी ए.बी.गुंजकर यांनी दि.२-०७-२०२० रोजी आदेश काढले होते. विरेगव्हाण तांडा येथील ग्रामपंचायत कडे हा आदेश प्राप्त झालेला असुन, जवळपास एक महिना उलटूनही तरी देखील ग्रामसेवकांडून हा निधी वाटप करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप दिव्यागातुन होत आहे

वारंवार मागणी करुनही निधी वाटपास कानाडोळा करीत आहे.एकप्रकारे गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.हा निधी त्वरीत खर्च करण्यात यावा, व अशी मागणी दिव्यागातून होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक