घनसावंगी तालुका

शाळा बंद,शिक्षण चालु : शिवनगाव शाळेचा उपक्रम

स्वातंत्र्य दिन उत्साहात : विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप

घनसावंगी /नितिन तौर दि १५

घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव येथील जि प शाळेत सामाजिक अंतर पाळत स्वातंत्र्य दिन उत्साहात करुन विद्यार्थ्यांना शाळा बंद शिक्षण चालु या संकल्पनेतून स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप करण्यात आला.
यावेळी सामाजिक अंतर पाळत ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहन करुन जि प प्राथमिक शाळेत ध्वजारोहन करण्यात आले.


तसेच शाळा बंद मात्र ऑनलाइन शिक्षण चालु असल्याने अनेक आडचणीला सामोरे जावे लागत होते त्यातच काही विद्यार्थ्यांच्या पालकाकडे मोबाईल ची सुविधा नसल्याने अडचणी येत होत्या यामुळे पंचायत समिती सभापती भागवत पाटील रक्ताटे,उपसभापती बन्शीधर शेळके यांच्या संकल्पनेतून व गटशिक्षणाधिकारी रविंद्र जोशी यांच्या प्रेरणेतुन व सहशिक्षक युवराज डावकर यांच्या मार्गदर्शनातून शिवनगाव जि प प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी एक पाउल पुढे जात विद्यार्थ्यांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर घरात राहून सोयिस्करपणे अभ्यास करता यावा यासाठी नविन सन्कल्पना राबवली असुन स्वखर्चाने स्वाध्याय पुस्तिका तयार करुन प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वाटप करण्यात आले.
यावेळी सर्व शिक्षक व मुख्याध्यापकाचे गावकर्यांच्या वतीने आभार मानन्यात आले.


यावेळी मुख्याध्यापक एस पी तौर,सहशिक्षक एच डी रमधम,वाय जि डावकर,ग्रामसेवक के टी सोनमाळी, सरपंच अशोक तौर,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रामेश्वर तौर, प्रकाश तौर,अंगणवाडी सेविका शोभा तौर,अंकुश तौर सूर्यकांत तौर,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक