घनसावंगी तालुका

कोरोना महामारिच्या काळात जिम्मेदार अधिकार्यांचे दुर्लक्ष : उद्धव मरकड

तहसिलदारांसह तालुका आरोग्य अधिकार्यांच्या बेजाबदारपणाचा आरोप : तालुका शिवसेनेची कार्यवाहीची मागणी

घनसावंगी प्रतिनीधी/नितिन तौर दि १५

घनसावंगी तालुक्यात विविध ठिकाणी कोरोना चे रुग्ण वाढत असताना महसूल प्रशासन व आरोग्य विभागाकडून बेजाबदारपणे कामे केली जात असल्याने संबधित अधिकार्यांवर कलम 188 नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख यानी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील बोडखा येथील एका व्यक्तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर व्यक्तीला 2 ऑगस्ट ला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर आरोग्य विभागाने कुठलेही माहिती घेतली नाही व यावेळी कोरोना सारख्या महामारिने संपुर्ण जग हैराण असताना तालुक्याचे तहसिलदारांसह आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी यांनी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कंड़ारी अंबड,भोग्गाव,मुरमा,तिर्थपुरी,घनसावंगी,रांजनी व कुंभार पिंपळगावात पुरेशा सुविधा व खबरदारी न घेता कोरोना सेंटरवर पॉझिटिव्ह रुग्णांना निकृष्ठ दर्जाचे जेवण देऊन स्वच्छतेची विशेष काळजी घेतली नसुन दुर्लक्ष केले

तसेच बोडखा गावातील 2 ऑगस्ट ला कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा 13 ऑगस्ट रोजी मृत्यु झाल्यानंतर सदर व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लघन तहसिलदार व आरोग्य अधिकार्यांनी केले असल्याने त्यांच्यावर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख उद्धव मरकड यांनी एका पत्राद्वारे केली असुन संबधित अधिकार्यांवर कार्यवाही न केल्यास शिवसेना स्टाईलने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक