दिवाळी अंक २०२१

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील विद्यार्थी विकास याने सायकल बाईकचा लावला शोध

परतूर /प्रतिनिधी
परतुर येथील लालबहादूर
शास्त्री महाविद्यालयात बीए द्वितीय वर्षात शिकत असलेला विकास प्रकाशराव सोळंके ह्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत घेत गॅरेज वर काम करत असताना मागील लॉ कडा ऊ न च्या काळात जुन्या मोटर सायकल चे इंजिन सायकल ला जोडून 1 लिटर पेट्रोलमध्‍ये 72 (बाहा त्तर )किलोमीटर चालणारी सायकल बाईक तयार केले. विकास ची घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून त्याचे वडील शेतमजुरी करत आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे बारावी नंतर विकासने थेट पुणे गाठले आणि पुण्यामध्ये एका गॅरेजवर काम करण्यास सुरुवात केली. गॅरेज वर काम करत असताना विकास ची संशोधकवृत्ती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती काहीतरी नवीन करण्याची तळमळ व जिद्द त्याच्यामध्ये होती यातूनच त्याने जुन्या मोटर सायकल चे इंजिन ,सायकल ला लावून ,सायकल बाइक तयार करण्या ची नविन कल्पना सुचली. दरम्यानच्या काळामध्ये संपूर्ण देशात लॉक डाऊन लागल्यामुळे विकास ला परत परतुर तालुक्यातील खांडवी आपल्या मूळगावी परतावे लागले.

images (60)
images (60)

विकास ची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे स्वतःचा उदरनिर्वाह व घरच्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पुन्हा त्याला परतूरच्या गॅरेजवर काम सुरू करावे लागले. विकास च्या मनात असलेली कल्पना पूर्णत्वाला आणण्यासाठी त्याने मित्रांच्या सहकार्याने व स्वतः जवळील काही थोडाफार पैसा खर्च करून एक जुनी सायकल व जुन्या मोटरसायकलचे इंजिन खरेदी करून आपल्या मनातील निश्चित केलेला प्रयोग सुरू केला .यामधून त्याने बाईक सायकल तयार करण्यात यश मिळवले. ज्या बाईकचे मायलेज एक लिटर मध्ये 72 ( बाहास्तर )किलोमीटर आहे.
आज विकास हा गॅरेज वर काम करून लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात परतूर येथे शिक्षण घेत आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असूनही स्वतः मेहनत करून थोडाफार पैसा कमावून स्वतः जिद्दीने हा प्रयोग करून त्याने सायकलबाईक चा संशोधन करून संपूर्ण तालुक्यात कुतूहल निर्माण केले आहे. मनात जिद्द असेल व मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश सहज मिळवता येते , हा विकास ने युवकांसमोर आदर्श निर्माण करून दिला.


या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय कपिल भैया आकात. मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय कुणाल दादा आकात , माजी आमदार हरिभाऊ खांडविकर ,लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सदाशिवराव मुळे महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच खांडवी येथील भुजंगराव बरकुले माजी जि.प सदस्य अशोकराव बरकुले सरपंच विष्णू बरकुले, ज्ञानोबा बुरकुले, विश्वनाथ घरकुले चेअरमन अंकुषराव बरकुले जनार्धन राव बरकुले सा. ग्रंथपाल श्री केशव बुरकुले शेख कढुभाई प्रकाश सोळके मा जि.प सदस्य भिमराव साळवे सरपंच गणेश हारकळ इत्यादींनी अभिनंदन केले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!