Breaking News
जालना जिल्हा

आता जनावरानाही लंपी स्किन डिसीज साथीच्या रोगाची भीती

सविस्तर माहिती न्यूज जालना लाईव्ह वर

जालना / तुकाराम राठोड दि १६

हा आजार शेळ्या-मेंढ्या तसेच मानवाला होत नाही.सदरील रोगाचे नाव लंपी स्किन डिसीज असे आहे. या आजाराची सुरुवात भारतात सर्वात प्रथम ऑगस्ट 2019 मध्ये ओडिसा येथून झाली, याचा प्रसार पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यांत झालेला आहे. महाराष्ट्रात गडचिरोली येथे या रोगाची सुरुवात झाली आहे आणि आता सध्या बीडमध्ये या रोगाच्या सदृश्य लक्षणे असलेले रुग्ण पाहायला मिळतात. हा एक विषाणूजन्य (viral) रोग आहे, ह्या रोगाचा प्रसार कीटके जसे डास, माश्या, गोचीड इत्यादी मार्फत होतो, उष्ण व आर्द्र हवामानात याचा जास्त प्रसार होतो.
याची लागण संकरित व देशी गाय वर्ग आणि म्हैस वर्गातील पशूंना होतो. सर्व वयोगटातील जनावरांना बाधा होते परंतु लहान वासरामध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. याचा प्रसार साधारण 10 ते 20% जनावरांमध्ये होतो तसेच यातील मरतुकीचे प्रमाण कमी असून ते फक्त एक ते पाच टक्के इतकेच आहे.

हा आजार शेळ्या-मेंढ्या तसेच मानवाला होत नाही

रोगाचे लक्षणे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांना ताप येतो, डोळ्यातून तसेच नाकातून स्राव होणे, भूक मंदावणे इत्यादी सुरुवातीच्या लक्षणे दिसतात नंतर डोके, मान, पाय, पाठ, इत्यादी ठिकाणी दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात, त्यातून पू येऊ शकतो. तसेच इन्फेक्शन नाका मध्ये गेले तर निमोनिया होऊ शकतो.

उपचार
हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर उपचार नाही परंतु जखमामध्ये जिवाणूंचा संसर्ग होऊन दुय्यम आजार होऊ नये म्हणून प्रतिजैविके तीन ते पाच दिवस द्यावी लागतात, सोबत तापिसाठी औषधी द्यावी लागतात. त्याचबरोबरीने रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे औषधीचा वापर करावा लागतो. ५ ते ७ दिवसाच्या नियमित योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. सर्व उपचार पशुवैद्यकाच्या सल्यानेच करावेत.

लसीकरण
सद्य स्थितीत या रोगावर लस नाही.

लिंबाच्या पाल्याचे धुपट करा जेणे करून गोठ्यामध्ये डास आदी कीटक निर्माण होणार नाही आणि गोठ्यामध्ये फॅन कुलर ची व्यवस्था करावी .

रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
हा आजार किटकांपासून प्रसार होत असल्याने आपल्या गोठ्यातील किटकांचा बंदोबस्त करावा लागेल. त्यासाठी जनावरांचा गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा लागेल. तसेच गोठ्याशेजारी पाणी, शेन,मुत्र जमा होऊन चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात असलेले कीटक मारण्यासाठी कीटनाशकांचा वापर करावा तसेच घरच्या घरी कीटकनाशक बनविण्यासाठी
दहा लिटर पाण्यात 40 मिली करंज तेल, 40 मिलि निम तेल आणि 10 ग्राम अंगाची साबण चांगली मिसळून घ्यावी, हे द्रावण दिवसातून दोन ते तीन वेळा फवारल्यास आपल्या गोठ्यामध्ये सर्व प्रकारच्या कीटकांचे निर्मूलन होते व या रोगाचा प्रसार रोख्यासाठी मदत होऊ शकते.

तरी जिल्ह्यातील पशुपालकांना आव्हान करण्यात येते की वरील आजाराची लक्षणे आपल्या पशूंना दिसून आल्यास घाबरून न जाता नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क करून उपचार करून घ्यावा.

मृत जनावरांची विल्हेवाट
जर काही जनावरे या रोगाासून मृत झाली तर अशी जाणारे आठ फूट खोल खड्डा काढून त्यात पुरावेत आणि पुरताना जनावरावर चुना किंवा इतर जंतुनाशके टाकून नंतर त्याची विल्हेवाट लावावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक