बिड जिल्हा

आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण गावात चक्क पत्र्याच्या शेडमध्ये स्थापन केली सॉफ्टवेअर कंपनी

बीड प्रतिनिधी / तुकाराम राठोड
‘चुकली दिशा तरीही न हुकले श्रेय सारे,या वेड्या मुसाफीराला तारील सर्व तारे’ ह्या विंदा करंदीकरांच्या ओळी एका कवितेत असल्या तरी ध्येयवेड्या मुसाफिरासाठी त्या खऱ्या ठरतात.

इयत्ता दहावीनंतर आयटीआय कोर्स केलेल्या एका युवकांनं चक्क पत्र्याच्या शेडमध्ये आयटी कंपनी स्थापन करून आज 15 ऑगस्ट 2020 रोजी या कंपनीचे लोकार्पण केले.ही गोष्ट म्हणजे काल्पनिक नसून जिद्दीने पेटलेल्या तरुणाची गोष्ट आहे.बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण गावाच्या जिद्दी तरुणाचं नावं आहे ‘दादासाहेब भगत’.वय वर्ष फक्त २८ असलेल्या या तरुणाच्या कंपनीचे नाव आहे’नाइन्थमोशन’….! या नाइन्थमोशन कंपनीच्या एका सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही टेम्प्लेट,रिपोर्ट कार्ड,लग्न,वाढदिवस यांचे कार्ड बनवू शकतात.दादासाहेब भगत यांना आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातल्या ‘इन्फोसिस कंपनीत’वार्डबॉय म्हणून नोकरी मिळाली.यावेळी त्यांनी कंपनीतल्या काही इंजिनियर मित्राकडून सॉफ्टवेअर कसे तयार करतात.?याबद्दल शिकून घेतलं.तब्बल तीन वर्षे कंपनीत काम केल्यानंतर अचानक कोरोनामुळे कंपनीने कामावरून काढून टाकले.गावाकडे रोजगाराचा प्रश्न असल्याने दादासाहेबनं काही मित्रांच्या मदतीने ‘डू ग्राफिक्स’नावाचं सॉफ्टवेअर बनवून घेतलं.संगणकाची जुळवाजुळव केल्यानंतर कंपनी कार्यालयासाठी जागा मिळत नव्हती म्हणून चक्क पत्र्याच्या शेडमध्ये ऑफिस थाटलं. या कंपनीत आज 25 कर्मचारी कार्यरत असून कंपनीच्या माध्यमातून आजरोजी दादासाहेब भगत 5545 कंपन्यांना ऑनलाइन सेवा पुरवीत आहे.भविष्यात एक हजार बेरोजगार उमेदवारांना नोकरी द्यायची असून कंपनीचा विस्तार संपूर्ण जगात पसरवायचा आहे.असे दादासाहेब सांगतो. दादासाहेब यांच्या कंपनीने बनवलेलं ‘डू ग्राफिक्स’ सॉफ्टवेअर हे ‘फोटोशॉप’च्या सॉफ्टवेअर प्रमाणेच असून ते कॉम्पुटरमध्ये इंस्टॉल करण्याची गरज नाही.

ते फक्त ऑनलाईन उपलब्ध असणार आहे.सॉफ्टवेअरमध्ये व्हिडीओ ईडीटीगंचा पर्याय उपलब्ध असून अनेक कंपन्या या सॉफ्टवेअरची सेवा खरेदी करत आहेत.अंगी कुठलेही तांत्रिक ज्ञान नसतांना,उच्च शिक्षण नसतांना केवळ अनुभव आणि जिद्दीमूळे सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करणाऱ्या दादासाहेब भगत यांच्या जिद्दीला युवकमित्र परिवाराचा जाहीर सलाम!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक