जाफराबाद तालुका

खानापूर जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विदयार्थ्यांना एन-95 मास्क,सँनीटायझर वाटप


टेंभुर्णी/सुनील जोशी दि १६
जाफराबाद तालुक्यातील खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मॅनकाइंड कंपनी च्या वतीने सर्व विदयार्थ्यांना 25 हजार रुपये किंमतीचे उच्च प्रतीचे एन-95 मास्क आणि हॅन्ड सँनीटायझर वाटप करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक विनोद कळंबे यांनी कंपनी चे वैद्यकीय प्रतिनिधी विजय भोपळे यांच्या माध्यमातून सदर बाबीची मागणी केली होती.श्री भोपळे यांनी कंपनी चे एरीया मॅनेजर ब्रिजेश कुमार यांच्याशी चर्चा करून मास्क,सँनीटायझर उपलब्ध करून दिले.

सध्या शाळेत विदयार्थी नसल्याने प्रातिनिधिक स्वरूपात 10 विदयार्थ्यांना सदर मास्क आणि सँनीटायझर देण्यात आले,उर्वरित विदयार्थ्यांना घरोघरी जाऊन वितरीत करण्यात येणार आहे.शाळा सुरु झाल्यावर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी विदयार्थ्यांना मास्क, सँनीटायझर चा उपयोग होणार आहे.स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील ग्राम संसद मध्ये सरपंच शोभाबाई शेळके तर शाळेत समिती अध्यक्ष सुभाष तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गजानन शेळके, दमोता तायडे, मधुकर शेळके, दमोता तायडे, डिगंबर शेळके, कैलास तायडे, त्रिंम्बक शिंदे, महादू शेळके, भगवान शिंदे, ग्रामसेवक रंजित जाधव,चंदू शिंदे, नारायण तायडे, रामदास शेळके, ज्ञानेश्वर शेळके, नंदू तायडे, पंढरी शेळके, भागवत तळेकर, सुनिल तायडे, विठ्ठल तायडे, दिनेश डोईफोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्तिथ होते.ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मॅनकाइंड ने सामाजीक बांधीलकीं जोपासल्याबद्दल कळंबे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक