Breaking News
घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावच्या रोहित्राकडे विजवतरणचे दुर्लक्ष -अर्धे गाव पंधरा दिवसापासून अंधारात

कुंभार पिंपळगाव येथील मुख्य बाजारपेठेतील दोन रोहित्र मागील पंधरा दिवसापासून बंद

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी दि १६

घनसावंगी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या कुंभार पिंपळगाव येथील ग्राम पंचायत परीसर भागात असलेले दोन रोहित्र पंधरा दिवसापेक्षा अधिक दिवसापासून निकामे झाले आहे यातच वीजवितरणकडून निकामी रोहित्र काढूनही नेण्यात आले आहे परंतु अद्यापपर्यत नवीन रोहत्र न दिल्याने मात्र गावात सर्वत्र अंधारमय परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे विजवतरण चे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांतुन होत आहे.

रोहित्र निकामे झालेल्या भागात कोरोना कंटेंमेंट झोन सुद्धा होता,महारुद्र मंदिर परिसर,महादेव मंदिर ,परिसरअंधारात आहे ,सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रोहित्र नसल्याने ग्रामस्थांनचे हाल होत आहे उद्योग,व्यवसाय,पाणी,दळण संकटात सापडले आहेत गावाच्या महत्त्वाच्या ठिकाणी वीज नसल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत विजवतरण ने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्राम विकास युवा मंच ने केली आहे .

कैलाश हुमने – अधीक्षक अभियंता विजवतरण

याबाबत माहिती मिळाली आहे आणि लवकरच रोहित्र देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

लवकरात लवकर रोहित्र द्यावे- ग्राम विकास युवा मंच कुंभार पिंपळगाव

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, बैलपोळा, महालक्ष्मी, गणेशोत्सव च्या पूर्वी सदरील विषयात महावितरण कंपनी ने लक्ष घालून तात्काळ रोहित्र उपलब्ध करून दयावे अशी मागणी ग्रामविकास युवा मंच कुं पि तर्फे करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक