देशविदेश

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून पुण्यात कोविड सेंटरची उभारणी


नागरिकांसह पत्रकारांसाठी सर्व सोयी-सुविधा

न्यूज मुंबई ब्युरो दि १६-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हे नेमहमिचा अनेकांच्या मदतीला धावून जात असते . पत्रकार संघटनेचे संघटक संजयजी भोकरे यांच्या संकल्पनेतून पुण्यात कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली कारण देशासह महाराष्ट्रात देखील कोरोनाने थैमान घातले आहे त्यातच पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

अशावेळी शासनाव्यतिरिक्त वेगवेगळ्या संघटना मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यात आता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून देखील पुढाकार घेत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. डेक्कन भागातल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या जागेत हे सेंटर उभारण्यात आले आहे. यात सामान्य नागरिक आणि विशेषतः पत्रकारांना सुविधा देण्यात येणार आहेत. या सेंटरमध्ये 120 पेक्षाअधिक बेड उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील असणार आहे. या सर्व सुविधा विनामूल्य असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक