मंठा तालुका

मंठा तालुक्यातील तळणीत ५ दिवसाचा जनता कर्फ्यु

तळणी(ता मंठा)/प्रतिनिधी दि १६ : कोरोनाने जगभरात थैमान घातले असून मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरातील गावात कोवीड -१९ चे रुग्ण आढळून आले . कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तळणीतील व्यापाऱ्यांनी १७ ते २१ ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्याला आहे .


यामध्ये दवाखाना व मेडीकल वगळून सर्व दूकाने बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात तळणी येथील व्यापारी संघटनेने पोलीस व तहसील प्रशासनाला निवेदनाव्दारे कळविले आहे .

कारवाई होणार – पोलीस कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या दरम्यान चोरून विक्री करणाऱ्या दूकानदावर कारवाई केली जाईल, असे बीट जमादार केशव चव्हाण यांनी सांगितले .

कडकडीत बंद पाळणार – व्यापारी


१७ ते २१ ऑगस्टपर्यंत तळणी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महादेव सोनूने व उपाध्यक्ष रितेश चंदेल यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक