Breaking News
बदनापूर तालुका

बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे सुरू झालेल्या अभ्यासिकेला अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ दि १६
बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे नेमकीच लोकसहभागातून विद्यार्थीना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली असून बदनापूर तालुक्यातील नुकतेच एम पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपविभागीय पोलिस अधिक्षक पदी निवड झालेले भरत महेर व तहसीलदार रवी सतवन यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला तर यश मिळाल्या शिवाय राहणार नाही. शिक्षण हेच वाघिणी चे दूध आहे ते पिल्यावर कोण्ही ही गुरगुर केल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने अभ्यासिकेला १५ हजार रुपयाचे मोफत पुस्तक वाटप करण्यात आले. या प्रसंगी राजेवाडी गावाचे रहिवासी असलेले अप्पर जिल्हा अधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी लाईव मार्गदर्शन केले.या वेळी भागवत बिघोत, युवराज बहुरे,भगवान डोभाल,तोताराम बहुरे,रवी सतवन, भरत महेर,संजय गुसिंगे,प्रताप गुसींगे,कचरू गुसिगें, चैनसिंग गुसिंगे, संतोष गुसिंगे, राजुसिंग गुसींगे व इतर गावकरी उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक