Breaking News
जालना जिल्हा

अंजानी आई फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

न्यूज ब्युरो जालना दि १६ – ज्ञानज्योत बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व अंजानी आई फाऊंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन चित्रकला, रांगोळी व व्हिडीओ संदेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

कोरोना जनजागृती अभियानांतर्गत या स्पर्धेचे उद्‌देशय कोरोना संसर्ग पासून बचाव व उपाय या विषयी 5 जुलै 2020 ते 30 जुलै 2020 दरम्यान ऑनलाईन चित्रकला, रांगोळी, व्हिडिओ संदेश स्पर्धेत 80 स्पर्धकांनी सहभाग नोंदविल्या होता.  चित्रकला स्पर्धेसाठी पाचवी ते दहावी असे दोन गटात करण्यात आले. तसेच महीलांसीठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण 15 ऑगस्ट, शनिवार रोजी शासनाच्या नियमाप्रमाणे करण्यात आले.

 या बक्षिस वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी शेख इब्राहिम , तर प्रमुख पाहुणे म्हणून बी. एच. किरवले, एम. डी. सरोदे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे बी.एच. किरवले म्हणाले की, कोरोना संसर्ग पासून स्वतःचे व कुटूंबाचे बचाव करा, मास्कचा वापर करा, सामाजिक अंतर पाळा, गर्दीत जाणे टाळा, आवश्यकता भासल्यास कोरोना चाचणी करून घ्या, आजूबाजूच्या लोकांना मदत करा, शासनाच्या नियमांचे पालन करा असे ही त्यांनी सांगितले, नंतर या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

यात तीन ते पाच वर्षे व्हिडिओ संदेश स्पर्धेत  प्रथम बक्षीस – विराज राजकुमार दांडगे याने तर द्वितीय बक्षीस – हितेन अमोल मोहाळे याने मिळविले. पाचवी ते सातवी चित्रकला स्पर्धेत प्रथम बक्षीस- हर्षद देवकर, द्वितीय बक्षीस- जैनब सलीम शेख, तृतीय बक्षीस- उत्कर्ष विकास भाले, उतेजनार्थ – भक्ती विष्णू गिते,  उतेजनार्थ -प्रमोद भारत एखंडे हिने मिळविले.  आठवी ते दहावी चित्रकला स्पर्धेत  प्रथम बक्षीस – शिवकण्या भारत एखंडे, द्वितीय बक्षीस -भारती अर्जुन पठारकर,  तृतीय बक्षीस-स्नेहल राजू वाघ,  उतेजनार्थ -आर्शिया शेख सलीम,  उतेजनार्थ -ऋतुजा विकास भाले हिने मिळविले. रांगोळी चित्रकला स्पर्धेत प्रथम बक्षीस -मेघा दशरथ गारुडी, द्वितीय बक्षीस -रजनी रंजितपाल खंडागळे, तृतीय बक्षीस- सोनल संजय झाल्टे, उतेजनार्थ – मनीषा सांडू गडवे, उतेजनार्थ-कोमल महेश गडवे यांना मिळाले. या सर्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस स्वरूपात रोख रखम व प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रास्ताविक फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती आडेकर यांनी केले तर आभार फाऊंडेशनच्या सचीव विद्या जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक