जालना तालुका

दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे अचानक विहिर खचली

तुकाराम राठोड /जालना दि १६

जालना तालुक्यातील ऊमरी येथिल धोंडीराम बबन गाडेकर (वय ३१)मागील एक दोन दिवसापासून संततधार पाऊस पडत असलयाने,गट कमांक 19 मध्ये असलेली विहिर अचानक विहिर खचल्याने विहिरीमध्ये असलेली दोन पाण्यातील मोटार,पाईप,वायर ई.४ ते ५ लाखांचे नुकसान झाल आहे

विहरीला एकुण १० सिमेंट चे कडे बांधकाम केले होते.विहिर ही ६० फुट खोल होती.या विहरीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये गाळ साचले आहे. तसेच या विहिरीला भरपुर पाणी असल्यांने या शेतकऱ्यांने एक हेक्टर वर आंगुराची लागवड केली होती.या अगोदर आंगुर बगीच्याला दहा ते पंधरा लाख रुपये खर्य त्यांनी केले आहे.

व आता विहिरीचे नैसर्गीक संकट त्याच्यासमोर आहे. या नैसर्गीक संकटामुळे त्यांना फार मोठा नुकसानीचा सामना करावा लागत आहे, नुकसान भरपाईची मागणी धोंडीराम बबन गाडेकर यांनी तलाठी याना दिलेल्या अर्जात केली आहे

पंचनामा केला -तलाठी एस. ददरे

सदर्भित विहिरीचा पंचनामा आजचा केला आहे प्रशासन स्तरावर  अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे न्यूज जालना शी बोलताना सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक