अंबड तालुका

रोहिलागडमध्ये संततधार पावसामुळे घराची भीत कोसळली

रोहिलागड /योगेश लहाने दि १६ – अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील जयराम नामदेव तारडे यांचे घर सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे कोसळले आहे .

त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे . पावसामुळे घरांच्या भिंतीत पाणी मुरल्यामुळे भिंती कोसळल्या असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे . जयराम तारडे यांची परिस्थिती जेमतेम असतांना आता घर कोसळल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .

जयराम तारडे यांच्या सतर्कतेमुळे जीवीत हानी टळली आहे . घर कोसळल्यामुळे जयराम तारडे यांचे ६० ते ७० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे . प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

शिवसंग्राम संघटनेच्या वतीने नुकसान भरपाईची मागणी

अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील जयराम नामदेव तारडे यांचे संततधार पावसामुळे घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तरी शासनाने लवकरात लवकर झालेली नुकसान भरपाई द्यावी व लवकरात लवकर या गरिब कुटुंबाला घरकुल मंजूर करून द्यावे अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मा.तहसिलदार अंबड देण्यात येणार आहे.यावेळी शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, ग्रामसेवक यु.एन.जाधव, हनुमान तारडे, तुळशीराम पांढरे  आदी याची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक