जालना जिल्हा

जालन्यात मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी भरपावसात उपोषण


न्याय मिळेपर्यंत माघार नाही – गणपत कांबळे

न्यूज जालना ब्युरो दि १६: साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, मातंग समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जावे, बार्टी च्या धर्तीवर स्वतंत्र आर्टी संस्था स्थापन करावी या व अन्य ज्वलंत मागण्यासाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांनी रविवारी ( ता. १६) पासून जालन्यात भरपावसात बेमुदत आमरण उपोषण सुरु केले असून आता समाजास न्याय मिळेपर्यंत माघार घेतली जाणार नाही असा इशारा ही गणपत कांबळे यांनी दिला आहे.


मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेने वेळोवेळी निवेदने, आंदोलने करूनही दखल घेतली जात नसल्याने गणपत कांबळे यांनी दि. १२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लेखी निवेदनाद्वारे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता.


अंबड रोड वरील पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या भोलेश्वर नगरातील हनुमान मंदिर परिसरात गणपत कांबळे यांनी रविवारी सायंकाळी ४.०० वा. आमरण उपोषणास सुरूवात केली.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, आण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या जयंती दिनी शासकीय सुट्टी जाहीर करून दारू ची दुकाने बंद ठेवावीत, मुंबई विद्यापीठास साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे नांव देण्यात यावे

मातंग समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण देऊन बार्टी च्या धर्तीवर प्रशिक्षण देणारी आर्टी संस्था स्थापन करावी, विधान भवन व संसदेच्या परिसरात दोन्ही महापुरुषांचे पुतळे उभारण्यात यावे, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना प्रती महिना पाच हजार रुपये मानधन मिळावे, कसत असलेले गायरान पट्टे विनाअट मातंग समाज बांधवांच्या नावे करण्यात यावे, लहुजी साळवे आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदिवासी, भिल्ल समाजबांधवांना आधारकार्ड, राशन व ग्रामपंचायत पुराव्यानुसार जात प्रमाण पञ दिले जावे. या मागण्यांचा समावेश असून शासन स्तरावरून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण थांबवणार नसल्याचा इशारा ही गणपत कांबळे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक