जालना तालुका

जालना तालुक्यात संततधार पावसामुळे मुगाच्या शेंगाला सुध्दा फुटले कोंब

सिंधीकाळेगाव /शाम गिराम दि १७

जालना तालुक्यातील मागील दोन दिवसांपासून पावसामुळे शेतकरी हैराण झाले आहे. जालना तालुक्यात रोजच रिमझिम, पाऊस पडत आहे .त्यामुळे ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य वाढत आहे. जागोजागी चिखल होत आहे.

शेतकर्यांचे शेतातील कामे सुध्दा बंद पडली आहे. आता मुग तोडणीला आला असता परंतु चार पाच दिवसापासुन, सतत रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे मुगाच्या शेंगाला सुध्दा कोंब फुटत आहे.

ग्रामीण भागात मुगाच्या शेंगाचा तोडा हाताशी आलेला घास जातो की काय अशी भिती शेतकर्यामध्ये निर्माण झाली आहे. मुग, कपाशी ,छोट मोठे सीड चे नुकसान होत आहे. बर्याच ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे.सततच्या पडणार्या रिमझिम, पावसामुळे शेतातील पिके पिवळे पडत आहे. व कपाशी पिकावर मवा पडत असल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण, झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक