भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यातओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन

मधुकर सहाने : भोकरदन

खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच वरून राजाने जोरदार हजेरी लावल्यामुळे भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून पेरणी केली आहे.परंतु सतत पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सर्वच गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कपाशी, मका,बाजरी ही पिके आडवी झाले आहेत.

मूग ,उडीद, बाजरी ला अंकुर फुटले आहेत.त्यामुळे भोकरदन तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर नारायण लोखंडे,विकास जाधव,सुरज सहाणे,तुळशीराम साबळे,कृष्णा लोखंडे आदींच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की अगोदरच मागच्या वर्षी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.

नोव्हेंबरमध्ये २०१९ मध्ये स्वतः उध्दव ठाकरेंनी आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना सरसकट हेक्ट्रि २५ हजारांची मदत करण्याचे आश्वासन दिलें होते परंतु ते आश्वसन हवेतच विरगळले की काय असा प्रश्न निवेदनात केलेला आहे.तसेच मागील सहा महिन्यांपासून लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचा माल बाजारपेठ बंद असल्याने घरातच पडून राहिल्याने नुकसान झाले.

शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यातच आता सततच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे त्वरित संबधित विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तरुणांनी निवेदनाद्वारी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक