अंबड तालुका

पोळा सण सार्वजनिकरीत्या साजरा न करण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांचे आव्हान

अनिल भालेकर/अंबड दि १७

भारतीय संस्कृती मध्ये सण उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.श्रावण मास समाप्त होताच लागोपाठ येणाऱ्या सण उत्सवा निमित्त सर्वत्र चैतन्याचे व आनंदाचे वातावरण असते. परंतु महाराष्ट्रासह सर्व देशभर कोरोना महामारी मूळे उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटामुळे मर्यादा आलेल्या आहेत.

कलम 144 लागू असल्यामुळे एका ठिकाणी एकत्रितरीत्या येता येत नाही. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस स्टेशन परिक्षेत्राचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी सर्व जनतेस व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. की जिल्हाधिकारी जालना यांचे जमावबंदीचा आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने शेतकरी राजाचा पोळा हा सण जवळ आलेला आहे.तरी सदर सणाच्या दिवशी शेतकऱ्यांनी आपले बैलांची घरीच पूजा करावी.

दरवर्षीप्रमाणे मिरवणूक कोणीही काढू नये तसेच कोणीही ही एकत्र जमा होऊ नये याची काळजी घेणे. जेणेकरून आपण व आपल्या परिवाराची कोरोना या रोगापासून सरंक्षण होईल व या रोगापासुन दुर रहाला. सध्या शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत तरी कुणीही धार्मिक स्थळी एकत्र येऊ नये आपण आपल्या घरीच पोळा हा सण साजरा करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक