Breaking News
देशविदेश

मंठ्यात ९ जण तर हसनाबादेत ६ जण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतच चालला

न्यूज जालना ब्युरो दि १७ –
जालना जिल्ह्यात आज सोमवारी दुपारी 30 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या 3708 इतकी झाली असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.

सोमवारी दि १७ ऑगस्ट दुपारी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या मध्ये मंठा येथील कोविड केअर सेंटरमधील 9 जणांचा समावेश असून भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील 6, फत्तेपुर 2, राजूर,गाढेगव्हान येथील प्रत्येकी 1, तसेच ओमशांती विद्यालय अंबड,आष्टी,बहुलफाटा ता.परतूर,सिंदखेडराजा येथील प्रत्येकी एक आणि जालना शहरातील अंबड रोड, मारवाडी गल्ली काद्राबाद,करवानगर,नळ गल्ली,क्रांतीनगर, चंदनझिरा येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक