अंबड तालुका

अंबड तालुक्यातील एकाचदिवशी ह्या गावात ११ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

अनिल भालेकर/अंबड दि १८

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लालवाडी येथील एकाच गावातील ११ जणांचा अहवाल सोमवारी रात्री आलेल्या अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आला आहे .

कोरोनात संकटाने आता ग्रामीण भागालाही आपल्या मगरमिठीत घेण्याचा चिंताजनक प्रकार दिवसेंदिवस दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अंबड तालुक्यातील महाकाळा या गावात एके दिवशी 39 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. शासकीय रुग्णालयाने जारी केलेल्या अहवालानुसार लालवाडी या गावातही एकाच दिवशी कोरोना चे 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. ग्रामीण भागातही कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात शिरकाव मुळे चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे.

आरोग्य विभागाकडून हाय रिस्क ची यादी तयार करण्यात आली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी न्यूज जालना लाइव्ह ला बोलताना सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक