परतूर तालुका

आष्टीत उपविभागीय अधिकाऱ्याकडून खत दुकानदारांची चौकशी

उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी केली चौकशी

राजेश्वर नायक /आष्टी न्यूज नेटवर्क दि १८
एकीकडे सामान्य शेतकरी आपल्या पिकासाठी दोन बॅग युरिया मिळवण्यासाठी कृषी सेवा केंद्राचे हेलपाटे मारत असताना दुसरी कडे मात्र काही कृषी सेवा केंद्र चालक मर्जीतील किंवा मोजक्याच शेतकऱ्यांना शेकडो बॅग देणाऱ्या आष्टी येथील दोन कृषी सेवा केंद्रासह संबधित शेतकऱ्यांची सोमवारी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी आष्टी येथे येऊन चौकशी केली आहे यात ही बाब समोर आली आहे.

आष्टी येथे युरीया चे तीन डीलर असून जवळपास 20 च्या जवळपास अधिक किरकोळ विक्रेते आहेत मात्र मागील काही दिवसांपूर्वी आष्टी येथे युरीया खत मिळणे दुरापास्त असल्याची ओरड शेतकरी वर्गातून उठत होती युरिया मिळाळा तरी इतर कंपनीच्या काही बॅगा घेण्याचा घाट काही कृषी सेवा केंद्र चालक लावीत असल्याचे प्रकार होत आल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात होते

युरीया खतावर सबसिडी असल्या कारणाने शासनाच्या नियमाप्रमाणे मशीन द्वारे संबंधीत शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करून खते दिल्या जातात मात्र सध्या कोरोना ची पार्श्वभूमी असल्याने केवळ आधार व नावाव्दारे प्रमाणीकरण होत आहे आष्टी येथील दोन कृषी सेवा केंद्र चालकांनी मर्जीतील काही शेतकऱ्याच्या नावे १०० पेक्षा ही जास्त बॅगा दिल्या असल्याचा प्रकार दोन कृषी सेवा केंद्र चालकांनी तीन शेतकऱ्यांच्या नावे शेकडो बॅग घेतल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असून त्या मुळे सोमवारी आष्टी येथील संबंधित कृषी सेवा केंद्र चालक व शेतकरी यांची उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी चौकशी केली एक शेतकऱ्याच्या नावावर जास्त बॅगा घेतल्याचे निदर्शनास आल्याने संबधित शेतकऱ्यांना तेवढी जमीन आहे का व त्यांना तेवढे खत लागते का या बाबत माहिती घेतल्याचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले


तर येरवी दोन युरिया च्या बॅगा घेण्यासाठी भटकंती करणारे शेतकरी आणि मर्जीतील शेतकरी यांना लागेल तेवढया बॅगा यात सामान्य शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचे चित्र या वरून दिसुन येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक