जालना जिल्हा

कर्मचाऱ्यांच्या शासन दरबारी असलेल्या प्रलंबीत मागण्यासाठी नगर पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन.

जिल्हयातील जालना, अंबड, भोकरदन, परतुर, बदनापुर, घनसांवगी, जाफ्राबाद आणि मंठा या नगर परिषद कर्मचाऱ्यांचा समावेश


न्यूज जालना ब्युरो दि १८

नगर पालिका व नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या शासन दरबारी असलेल्या प्रलंबीत मागण्या पुर्ण करण्यासाठी जिल्हाभरातील आठ नगर पालिका व नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी आज संप करीत काम बंद आंदोलन केले.

महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेनी शासनाने नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या दुर्लक्षित केल्यामुळे शासनाविरुध्द पुकारलेल्या कामबंद आंदोलनामध्ये जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, भोकरदन, परतुर, बदनापुर, घनसांवगी, जाफ्राबाद आणि मंठा या नगर परिषद आणि नगर पंचायत मधील कर्मचारी सहभागी झाले होते.

कामबंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री धर्मा खिल्लारे राज्य उपाध्यक्ष, केशव कानपुडे राज्य सचिव, राजाराम गायकवाड जिल्हा अध्यक्ष, चौधरी, देशपांडे, मकसुद, अमर खरात, आणि ईतर,आडे, गुंटुक भोकरदन, पवार, दाभाडे, पाथरे बदनापुर चव्हाण, खनपटे व जोशी, परतूर जाफराबाद आढाव यांनी सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक