भोकरदन तालुका

जिल्ह्यातील वृक्ष लागवड योजनेचा उडाला फज्जा

पिंपळगाव रेणुकाई /प्रतिनिधी दि १८

जिल्ह्यात ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गतवर्षी वृक्ष लागवड करण्यात आली . मात्र लागवड करण्यात आलेल्या वृक्षांमध्ये बहुसंख्य वृक्ष बेपत्ता असल्याने या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येते .

राज्य शासनाच्या वतीने वनविभाग , सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली होती . यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले . मात्र त्या वृक्षांचे संगोपनासाठी पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आली नाही . त्यामुळे लागवड केलेले वृक्ष दिसेनासे झाले आहेत . वृक्षांचे जतन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पुढाकार घेण्याची गरज आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक