Breaking News
भोकरदन तालुका

पिंपळगाव रेणुकाईत सर्प दंशाने शेतकऱ्यांचा मृत्यू

पिंपळगाव रेणुकाई /प्रतिनिधी दि १८

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई
येथील शेतकरी शेषराव महादु नरवाडे ( वय 65 ) यांचे सोमवार ता. 17 सायंकाळी पावणे सहा वाजता सर्प दंशाने निधन झाले. नरवाडे हे सोमवार ता. 17 दुपारी चार वाजेच्या सुमारास पिंपळगाव रेणुकाई येथील गट नं.311 मध्ये असलेल्या आपल्या गोठ्यातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले असता चाऱ्यामध्ये आसलेल्या सर्प दंश केला. दरम्यान उपचारासाठी नेत असतांनाच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकिय अधिकारी आर. एम. राऊत यांनी सांगितले.

त्यांच्या पश्चात एक भाऊ दोन मुले तीन विवाहित मुली नातवंडे असा परिवार आहे मंगळवार ता. 18 पारध पोलीस ठाण्याचे जमादार प्रकाश शिनकर, डुकरे यांनी पंचनामा केल्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेन करुन . सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पंचक्रोशीतील नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक