Breaking News
बिड जिल्हा

लाॅकडाऊन असलेल्या सहा शहरात महाविद्यालय प्रवेशामुळे इयत्ता 10 वी तील टि.सी.व मार्क मेमो काढण्याच्या प्रक्रियेेसाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना परवानगी-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बबनराव वाघ, उपसंपादक

न्युज बीड, दि. १८ : इयत्ता 10 वी चा निकाल घोषित झालेला असून बीड, अंबाजोगाई, माजलगांव, परळी, केज व आष्टी या 06 शहरामधील विद्यार्थ्यांना इतर शहरामधील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आणि या संस्थांच्या प्रवेशाची अंतिम तारीख जवळ आलेली असल्यामुळे इयत्ता 10 वर्गातील
टि.सी.व मार्क मेमो काढणेसाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना परवानगी देण्यात येत आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणू रुग्णांची संख्या बीड जिल्हयात मोठया प्रमाणात वाढ होत असल्यामुळे बीड, अंबाजोगाई, माजलगांव, परळी, केज व आष्टी हे 06 शहर 10 दिवसांकरिता दिनांक 12 पासून दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद असल्याने हे निर्देश देण्यात आले आहेत.

यानुसार इयत्ता 10 वी पास विद्यार्थी व त्यांचे एक पालक यांना फक्त टि.सी. व मार्क मेमो या ६ शहरामधील शाळेमधून काढणेसाठी परवानगी असेल. या शहरांमध्ये प्रवेश करण्यास व शाळेमध्ये जाणे यासाठी पासची आवश्यकता असणार नाही, परंतु शाळेचे ओळखपत्र व पालकांचे आधारकार्ड सोबत ठेवणे बंधनकारक असेल.

संबंधित शाळेचे शिक्षकांना यासाठी वेळेच कोणतेही बंधन न ठेवता 24 तास दररोज शाळेमध्ये थांबून कामकाज करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

इयत्ता 10 वी पास विद्यार्थी, पालक हे शाळेमध्ये आल्यानंतर एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही या दृष्टीने नियोजन करुन कोवीड-19 विषयक सामाजिक अंतर पाळणे बाबत प्रत्येक शाळेने सक्त सूचना द्याव्यात आणि त्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित शाळेची देण्यात आली आहे

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे, त्यातील पोट कलम 2(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये मनाई आदेश दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आलेे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक