भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात कोरोनाचे सावटात पोळा सन साजरा.

मधुकर सहाने : भोकरदन

राज्यभरात कोरोना या आजाराने थैमान घातले असुन याचे सावट पोळा सनावरही पाहायाला मिळाले,यावर्षी तालुक्यात कुठे पोळा भरवण्यात आला नव्हता.

कोरोनाच्या चिंतेत मंगळवारी शेतक-यांनी बैल पोळा सन साजरा केला.सोमवारी खांदेमळन करून मंगळवारी बैलांना जेवनाचे आमंत्रन दिल्या नंतर मंगळवारी पहाटे पासूनच बैलांना पानवठ्यावर नेऊन स्वच्छ धूऊन शिंगाना रंगरंगोटी करत गावकुसातील शेत शिवारात नेऊन दुपार पर्यंत चारा पाणी केले गेले तर ग्रामदैवत हनुमानाला नारळ फोडून शेत शिवारातील देवीदेवतांना नारळ,शेंदूर लाऊन पुजन केले गेले

दुपारी तीनच्या सुमारा पासुन दफडे लावुन कापडी झुली घालत बैलांना ग्रामदैवत हनुमंतरायाला दर्शन देऊन महीलांनी घरोघरी बैलांची पुजा करुन पुरण पोळीचे जेवन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक