Breaking News
जाफराबाद तालुका

बैल-पोळा सणावर कोरोनाचे सावट. शासनाच्या नियमांचे पालन करत, कुंभारझरी येथे बैल-पोळा सण साजरा.

कुंभारझरी/ प्रतिनिधी दि. 18.(आगस्ट) ता जाफराबाद येथील कुंभारझरी गावामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला बैल-पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.परंतु या वर्षी देशभर कोरोना चे असलेले महाभयंकर संकट त्यामुळे शासनाने या वर्षी कोणतेही सण साजरा करू नये असे आदेश दिले आहे

त्यामुळे त्याचा परिणाम बैल-पोळा सणवार देखील झाला असल्याचे शेतकरी सांगत आहे. कुंभारझरी येथे मोठ्या उत्साहात हा सण शेतकरी साजरा करत असे.दर वर्षी पोळा सणाला मा.प.स.सदस्य मधुकर पाटील गाढे हे सर्व बैल मालक शेतकरी यांना टोपी दुपाटे देऊन बैलांचा व त्याच्या मालकाचा सन्मान करत असतात.या वर्षी देखील त्यांनी आपली परंपरा कायम ठेवत गावातील सर्व बैल मालकांचा शेतकऱ्यांचा टोपी दुपाटे नारळ देऊन सन्मान केला. बैलांची पूजा केली.

या वेळी सरपंच संजय चव्हाण भगवान चव्हाण गणेश महाराज दिपक चव्हाण अशोक चव्हाण गजानन चव्हाण सुनील चव्हाण भगवान गाढे सह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. शासनाच्या नियमांचे पालन करत शांततेत कुंभारझरी येथे पोळा सण साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक