बदनापूर तालुका

बदनापूर शहरात अस्वच्छताबाबत नगरपंचायतला निवेदन

बदनापूर प्रतिनिधी/किशोर सिरसाठ: दि १८
बदनापूर शहरामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर तसेच सततच्या पावसामुळे शहरातील अनेक प्रभागात घाणीचे साम्राज्य कचऱ्याचे ढिगार झाले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदाच्या पावसाळ्या ऋतू मध्ये साथीचे रोग त्यातून कोरोणासारख्या रोगांनी थैमान घातले आहे. या कारणाने नागरिकांमध्ये आरोग्यबाबत भीती आहे.

बदनापूर जालना औरंगाबाद महामार्गावरील जागतिक प्रकल्प विभागा च्या हलगर्जीपणा मुळे होणारा प्रवाशांना रोजचा त्रास भोगावा लागत आहे अनेकांचे प्राण गत झाली आहे प्रवाशांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. कित्येक अपघातही सुद्धा रोज बघायला मिळत आहे. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात पाणी साचते त्यामधून अनेक दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे याबाबत तात्काळ नगरपंचायतीने कचऱ्याचे ढिगार प्रत्येक प्रभागातून उचलावे तसेच महामार्गावरील झालेले खड्डे बुजवण्यात यावे ही मागणी याबाबत बदनापूर नगरपंचायत ला नितीन भिमराव जऱ्हाड, नरेंद्र मुरलीधर साबळे, बळीराम शिंदे, युवकांनी निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक