जालना जिल्हा

बदनापूर, अंबड, जालना सह जिल्ह्यात पोळासण साध्या पध्दतीने साजरा

जिल्हाधिकार्‍यांना आदेशाचे पालन करत जिल्ह्यात पोळा साजरा

बदनापूर तालुका

बदनापूर: ता. 18 : बदनापूर प्रतिनिधी; किशोर सिरसाठ.
बैलपोळ्याच्या सणानिमित्त शेतकरी राजा हा आपल्या बळीराजाचा असलेला बैलपोळा सना निमित्त सादर करत असतो परंतु कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने मानवी जीवनावर परिणाम मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे हा संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी जिल्ह अधिकाऱ्याकडून जनतेला आलेले आदेशानुसार कुठे ही गर्दी करू नये बैल पोळा सण हा आपल्या घरी आपल्या दारी साजरा करावे असा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आल्याने बदनापूर येथील विद्यमान आमदार नारायण कुचे यांनी या आदेशाचे परिपूर्ण पालन करत स्वतःच्या बैल पोळ्या निमित्त आपल्या बैलजोडीची पूजा ही स्वतःच्या शेतात करून सहपरिवारास सहित बैलपोळा साजरा साजरा करण्यात केला..

अंबड तालुका

कवडगाव येथे नियमाचे पालन करून बैल पोळा साजरा

अनिल भालेकर/अंबड

शेतकरी राजाचा आवडता सण आणि आपल्या शेतात राब राब राबणाऱ्या बैल राजाच्या ऋणातून मुक्त होण्याच्या सन म्हणजे बैलपोळा होय. यावर्षीच्या बैल पोळ्या साठी कोरोना संकट मुळे मर्यादा आल्या आहेत.त्या मूळ काही प्रमाणात का होईना या उत्सवाला मर्यादा आल्या होत्या. परंतु आपल्या सर्जा-राजाच्या साज सुंगरात कोणतीही कमतरता न करता मनोभावे पूजा करण्यात शेतकरी राजाने कसलीही कमतरता केली नाही. अंबड तालुक्यातील कवडगाव या ठिकाणी सार्वजनिकरीत्या बैलपोळा ना भरता शासकीय नियमाचे पालन करून मोठ्या आनंदात व उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला. स्वतंत्ररित्या काढण्यात आलेल्या बैल मिरवणुकीमध्ये शेतकरी राजाने आपल्या सर्जा राजाला सजवून मानाच्या मारुती मंदिरासाठी स्वतंत्र पने दर्शनाला आणून विधिवत पूजा केली. याप्रसंगी डॉ.रामेश्वर राजगुडे, सतीश राजगुडे, पंढरीनाथ कदम, अनिरुद्ध कदम, रोहित राजगुडे, सौ संगीता राजगुडे आदी शेतकरी ग्रामस्थांनी उत्सवात हा सण साजरा केला

अंबड

जालना तालुका

सिंधीकाळेगाव येथे घरीच साजरी केला पोळा.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषानुमुळे यंदा बैला पोळा सन घरीच केला साजरा .पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना खांदीमळ केली जाते व दुसर्या दिवशी बैलांना तलाव किंवा पानवठ्यावर नेऊन स्वच्छ धुवुन, काढले जातात. नंतर बैलांच्या शिंगाना हिंगुळ मारतात चमकी, बाशींग, अंगावर झुला टाकतात नंतर गावात हनुमानाला नारळ फोडुन शेतीमध्ये देवांना नारळ फोडतात .व चार वाजेदरम्यान बैलांला मारोतीच्या दर्शनाला नेतात. बैलांना घरी आल्यावर बैलांची पुजा केली जाते. तसेच बैलांना पुरण पोळीचा नैवद्य दाखवला जातो.

जामखेड येथे कोरोणाच्या सावटात बैल पोळा सण साजरा

जामखेड प्रतिनिधी / विशाल भोजने

अंबड तालुक्यातील जामखेड हे सर्वात मोठे गाव या गावामध्ये कोरोणाच्या सावटात पोळा सण साजरा करण्यात आला या वेळी नागरिकांनी आपल्या बैलांना धुऊन त्यांच्यावर रंग रंगोटि करून त्याचा साज त्यांना घालून देवाच्या दर्शनासाठी घेऊन गेले यावेळी सोशल डिस्टंट पाळून सण साजरा करण्यात आला. वाडा शिवार सारं वाडवडिलांची पुण्याई किती वर्णु तुझे गुण मन मोहूरुन जाई तूझ्या अपार कष्टानं बहरते सारी भूई एका दिवसाच्या पूजेन होउ कसा उतराई व बैलांणा ओवाळुन सण साजरा करण्यात आला यावेळी हरिभाऊ कुंडकर,विजय भोजने,भिमाजी कुडकर,विशाल वैद्य,प्रल्हाद भोजने,अदि कुंडकर शेतकरी उपस्थित होते

जामखेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक