जालना जिल्हा

अनूसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाची कंत्राटी पदभरती रद्द

न्यूज जालना ब्युरो दि १८ सहआयुक्त तथा उपाध्यक्ष,अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समीती, किनवट ता.किनवट जि.नांदेड येथील समिती कार्यालयासाठी पदभरती संबंधीचा ठराव.  किनवट ता.किनवट जि.नांदेड येथे समिती कार्यालय सुरु करण्यासाठी मंजुरी प्रदान केलेली होती या समितीसाठी आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी तत्वावर पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती.

  हे समिती कार्यालय सुरु करण्यासाठी अधिकारी,कर्मचारी यांची एकुण पदे 22 पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिध्दी करुन विधी अधिकारी,विधी समन्वयक, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संशोधन सहायक या पदांसाठी येणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली होती. लिपिक टंकलेखक ,माहिती तंत्रज्ञान तथा संगणक सहायक, लघुटंकलेखक, शिपाई व सफाईगार या पदांसाठी येणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले होते.महाराष्ट्र शासन ,वित्त विभाग,क्रंमाक -अर्थसं-2020/प्र .क्र.65 /अर्थ -3 दि.04 मे 2020 रोजीचा शासन निर्णय व मा.आयुक्त ,आदिवासी संशोधन व प्रशिण संस्था, पुणे

यांचे पत्र क्र.आसंप्रसं/आस्था/का.1 /प्र.क्र.448 (अ) 2111 दि.21 जुन ,2020 अन्वये महाराष्ट्रात कोविड -19 च्या संसर्गजन्य रोगामुळे वित्तीय उपाययोजनेच्या अनुषंगाने चालु वित्तीय वर्षात सार्वजनिक आरोग्य विभाग व वैदकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पद भरती करु नये ,याबाबत सुचित केलेले आहे.राज्यातील कोरोना आजार प्रादुर्भाव स्थिती व वित्तीय स्थिती पाहता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट ता. किनवट,जि.नांदेड येथील कंत्राटी पदभरती रद्द करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असल्याने भरती प्रक्रिया रद्द करीत असल्याचे सहआयुक्त ,अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,औरंगाबाद यांनी कळविले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक