जालना जिल्हा

ऑनलाईन पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार व सुशिक्षित बेरोजगाराना नोकरीची सूवर्णसंधी

न्यूज जालना ब्युरो दि १८ जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अंतर्गत दुसरा ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 19 व 20 ऑगस्ट 2020 रोजी  आयोजीत करण्यात आलेला आहे.तरी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारानी https://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करून स्वत:चा युझरआयडी व पासवर्ड वापरून पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबमध्ये अधिसूचित रिक्तपदे तपासून पदाच्या पात्रते प्रमाने या मेळावामध्ये सहभाग नोंदवावा.

सदर मेळावा ऑनलाईन होणार असून सदर कंपनीच्या आवश्यकतेनुसार  Skype,Whatsapp, तसेच  व्हीडीओ कॉल व फोनद्वारे मुलाखत घेवून निवड प्रकिया होणार आहे. तरी जास्तीत जास्त बेरोजगारांनी रोजगार मेळावा सहभाग नोंदवावा. दुसरा ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवताना काही अडचण आल्यास  (( 02482) 225504 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या मार्फत करण्यात येत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक