Breaking News
बदनापूर तालुका

सोमठाणा धरण प्रकल्प 5 वर्षानंतर ओव्हरफलो, 15 गावांचा पाणी प्रश्न मिटला

बदनापूर प्रतिनिधी: किशोर सिरसाठ दि १९ बदनापूर तालुका हा दुष्काळी म्हणून ओळख असलेला तालुका यंदा पावसाच्या जून आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये झालेल्या पावसाने हा प्रकल्प पूर्ण भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावातील शेतकरी समाधान झाले असून बदनापूर शहरासह तालुक्यातील 15 गावांना पाणीपुरवठा दुधना प्रकल्प धरणातून होतो ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात भरून वाहू लागला त्यामुळे बदनापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे तालुक्यातील जी धरणे पावसाने वाट पाहत होती आता ती धरणे आता पावसाचे पाणी होऊन वाहू लागले मुख्य म्हणजे प्रकल्प मागील 2016 पासून तर 2020 पर्यंत कमी स्वरूपात पाणीसाठा होता मात्र यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिल्याने अवघ्या दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण भरून सांडव्यातून होऊन पाणी वाहू लागल्याने आजूबाजूच्या पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण निर्माण झालेला आहे
गडावरच्या रेणुका देवीच्या पायथ्याशी असलेल्या हा दुधना प्रकल्प साडवा ओसाडुन सोडवा वाहतोय..

धबधब्यांमुळे पर्यटनाचे स्वरूप निर्माण झालं ! बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी! या पूर्वी दुधा मध्यम प्रकल्प हा 2016 पासून जेनते स्वरूपात पाण्याचं पातळी होती तहानलेला मध्यम प्रकल्प आज आनंदाचं डोहात खुलून दिसत आहे हे वातावरण बघण्यासाठी तालुक्यातील बदनापूर शहरासह तालुक्यातील सर्व नागरिक एकच गर्दी करत आहे की निसर्गाचं वातावरण आणि रेणुका मातेच्या गडाच्या पायथ्याशी असलेलं एक सुंदर अशी मनाला भावणारे दृश्य बघण्यासाठी पर्यटन गर्दी करत आहे असख्य कुटुंबासह परिवारासह लोकांची गर्दी होत आहे दुधना प्रकल्पाच्या सांडव्यावरून धबधब्यासारखे पाणी पडल्याने नागरिक त्याचा मन भरुन आनंद घेत आहे वर गडावर रेणुका मातेचे मंदिर तर पायथ्याशी दुधना प्रकल्प धरणाच सांडव्यातून पाणी धबधब्यासारखे पडते प्रत्येक येणाऱ्या व्यक्तींना ते आकर्षित करते येथे मोठ्या प्रमाणात पर्यटनाची गर्दी होत आहे..दुधना धरण प्रकल्प या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाल्याने त्यामुळे सर्वाधिक फायदा बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे खरीप हंगामासाठी त्याचा मोठा फायदा होईल तृत रब्बी हंगाम गेला असेल परंतु खरीप हंगामासाठी त्याचा मोठा फायदा होईल सोमठाणा धरणात आता शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने बदनापुराकरणाचा पाणी टंचाईचा प्रश्न निकाली लागला गेल्या वर्षी धरणात पाणीसाठा कमी होता त्यामुळे गेल्या वर्षी पाणीसाठा प्रमाणात प्रमाणात बसली होती मात्र समाधानकारक पाणीसाठा झाल्याने बदनापूर तालुक्यातील गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे त्यामुळे बदनापूर तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे सोमठाणा धरण पाच वर्षांनी भरल्याने पाणीसाठात बोरवेल, पाण्याचा साठा वाढल्याने तसेच विहिरींची पातळी सुद्धा वाढेल त्यामुळे पुढील तीन ते चार वर्षात पाण्याचा प्रश्न बदनापूर करांचा मिटला आहे..
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान रेणुका मातेचा गड.. जालना औरंगाबाद जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविक वर्ग येत असतो नवरात्रात मध्ये नऊ दिवस ही यात्रा भरल्या जाते गडावरती श्रद्धा असलेले भाविक आप आपल्या रावट्या टाकून 9 दिवस आईच्या चरणाशी नवरात्रात राहतात आईचा नऊ दिवस उपास धरून आपल्या या भावना आपल्या श्रद्धा नवसाला पावणारी माता म्हणून या श्रद्धाने बघितले जाते. गडावरती असलेले भव्य आकर्षित मन मोहक हिरवेगार असं दृश्य…! उंच गडावर रेणुका मातेचे दर्शन घेऊन तो एक आनंद तसेच गडावर असलेलं छोटे तलाव, मंदिर, आणि तिथलं मनाला आकर्षित करणारे हिरवेगार गवताने झाडाझुडपांनी मनाला आकर्षित करतात जसा काही गडाने आईने गडावरती आईने हिरवा शालू नेसला म्हणावं असं वातावरण आईच्या चरणाशी गेल्यावर आपल्याला दिसून येतं एकीकडे आईच्या पायथ्याशी दुधना प्रकल्प धरण तालुक्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो आणि गडावर हिरवगार वातावरण आणि प्रकल्प भरल्याने जी धबधब्याची दृश्य ते मनाला मनमोहक करते म्हणून या ठिकाणी बघण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी करत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक