जालना तालुका

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत अपंग लाभार्थ्यांना तीन टक्के धनादेश वाटप:

बबनराव वाघ, उपसंपादक

प्रतिनिधी:(तुकाराम राठोड) जालना तालुक्यातील सावंगी तलान,बर्डी,ऊमरी व अंतरवाला येथील अपंग लाभार्थ्यांना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत व ग्रामपंचायत कार्यालय सावंगी तलान यांच्यामार्फत तीन टक्के निधीचे धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले.ग्रामसेवक पि.टी. चिंचोले,सरपंच विद्या विलास रंधवे,उपसरपंच डॉक्टर शाम कळकुंबे,भानुदास राठोड, प्रभाकर कळकुंबे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.तसेच एकूण 35 लाभार्थ्यांना 1875 रुपयाचे धनादेश वितरित करण्यात आले. त्यामुळे अपंग लाभार्थ्यांनी शासनाचे व सावंगी तलान येथील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंत व ग्रामपंचायत सदस्यां यांचे यावेळी मनपुर्वक आभार मानले.

लाभाथी:१.किशोर झोरे,२.दिलीप राठोड,३.शिवाजी झोरे,४.रवी खराडे,५.विलास रंधवे,६.कैलास राऊत,७.बंडु तोतरे,८.वल्लभ देशमुख,९.सुभाष रंधवे,१०.रविंद्र रंधवे,११.आसाराम रंधवे.व ईतर २४ लाभार्थी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक