Breaking News
घनसावंगी तालुका

राजूरकर कोठा गावात परत दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी दि १९
घनसावंगी तालुक्यातील राजूकरकोठा येथे मंगळवारी दुपारी आलेल्या अहवालात परत दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यात ५० वर्षीय युवक व ७ वर्षीय युवकांचा समावेश आहे.

राजूरकर कोठा (ता घनसावंगी)येथे मागील चार दिवसांपूर्वी दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्याच्याच संपर्कातील व कुटुंबातील परत दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाने याबाबत उपाययोजना सुरू केल्या असून राजाटाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राअतर्गत रपीड तपासणी ला सुरवात करण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ उमरे यांनी न्यूज जालना शी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक