जालना जिल्हा

गणेश उत्सवच्या तोंडावर कोरोणाच्या वाढत्या प्रभावामुळे ग्राहकांची मागणी कमी असल्याने चिंता वाढली

 

कोरोणाच्या वाढत्या प्रभावामुळे
ग्राहकांची मागणी कमी असल्याने चिंता वाढली

पिंपळगाव रेणुकाई ( ता भोकरदन ) विशेष प्रतिनिधी

फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देऊन भगवंतांची मूर्ती घडविणारा कुंभार आजही उपाशीच आहे . या पारंपरिक व्यवसायावर शेकडो कुटुंबाच्या घरातील दोनवेळची चूल पेटते . यंदा कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे या व्यवसायाला मोठी झळ बसली आहे

22 मार्चपासून सुरु झालेली ही होरपळ अजूनपर्यंत संपलेली नाही . कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून यातून कुंभार समाजाचा पारंपारिक व्यवसायसुध्दा सुटलेला नाही . दररोज कष्ट करुन , घाम गाळून राबणाऱ्या लोकांच्या व्यवसायाची टाळेबंदीच्या काळात पूरती वाट लागली आहे . फेब्रुवारी महिण्यापासून उन्हाळा सुरु होतो.चार महिण्यांच्या कालावधीत माठ , रांजण .घागर ही मातीची थंड पाण्याची भांडी विकली जातात . याच काळात
लग्नसराई असते .

वैवाहिक समारंभासाठी कुंभाराकडून खास घंगाळ व मातीची भांडी तयार करवून घेतली जातात . परंतु टाळेबंदीच्या काळात हा धंदा पूर्णपणे बुडाला . मातीचे तयार माठ न विकल्या गेल्याने कुंभार समाजात नैराश्य पसरले आहे . आता कुंभारांची उरलीसुरली भिस्त गणेशोत्सव , नवरात्र व दिवाळीवर अवलंबून आहे .परंतु
कोरोनाच्या संक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरुपात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवावरही नियंत्रण येणार आहे .

त्यामुळे कुंभार मंडळी घरगुती प्रतिष्ठापनेसाठी तयार होणाऱ्या मूर्ती घडविण्याच्या कामाला लागले आहेत . श्रीकृष्ण जन्माष्टमी , व पोळा या सणाला कृष्णाच्या मुर्ती व मातीचे बैल शेतकऱ्यांना पूजेसाठी तयार केले होते त्यांची मोठ्या विक्री होईल असे वाटले होते. परंतु त्या मुर्त्या पण अंगावर पडून आहेत.आता गणेशोत्सव या महिण्यातच आहे. निदान यावेळेस तरी आतापर्यंत झालेले नुकसान देवाच्या कृपेने भरुन निघेल ,अशी भाबडी आशा अपेक्षा त्यांना वाटत आहे . घरगुती गणरायांच्या मूर्ती बनविण्यात कुंभार बांधव कारागिरासह व्यस्त झाले आहे.

टाळेबंदीमुळे चार फुटांच्या वर मूर्ती बसविण्यास मंडळांना मनाई आहे . त्यामुळे गावातील मूर्तिकार घरगुती लहान मूर्ती तयार करण्यात व्यस्त असतांना दिसत आहे. आता नव्या जोमाने मरगळ व निराशा झटकून कामाला लागले आहे. आणि गणरायाच्या मृतांना रंगरंगोटी चा शेवटचा हात मारताना दिसत आहे

लावलेला खर्च आणि श्रमाचे मोल ही मिळेना

गावातील कुंभार वाड्यातिल सिल्लोडे कुटुंब हे कुंभार समाजाचे आहे. मातीची मडकी , भांडी , दिवे , कुंडी व देवीदेवतांच्या मूर्ती तयार करतात . महागाईच्या काळात मातीचे साहित्य विकणे कठीण झाले आहे . मेहनत जास्त व मिळकत , कमी असा प्रकार आहे . मातीची भांडी भट्टीत तापविली जातात . त्यासाठी काड्या विकत घ्याव्या लागतात . उत्पादन खर्च अधिक व मोल कमी अशा अडचणींमुळे नव्या पिढीतील तरुण व्यवसायापासून दुरावत असल्याचे मत दिलीप सिल्लोडे‌. रतन सिल्लोडे‌. दगडुबा सिल्लोडे. व राजु सिल्लोडे यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक