Breaking News
जालना जिल्हापरतूर तालुका

खा.संजय राऊत यांनी डॉक्टरांची माफी मागावी – वैद्यकीय डॉक्टर आघाडीची परतुरात मागणी


दिपक हिवाळे / परतुर न्यूज नेटवर्क


डॉक्टरांपेक्षा पेक्षा कंपाउंडर बरे असे बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध करीत सर्व डॉक्टरांची जाहीर माफी मागावी,अशी भाजपा वैद्यकीय आघाडी परतूरच्या वतीने परतूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे विधान केले की डॉक्टरांपेक्षा कंपाउंडर बरे, या वक्तव्यामुळे संपूर्ण कोरोना योद्धांचा अपमान झाला आहे. आज कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर्स हे एक प्रकारे देवदूत म्हणून काम करीत आहेत. एकीकडे महाराष्ट्र सरकारच्या प्रशासन आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील समन्वयाचा अभाव असताना देखील राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहे. त्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून पगार करण्यात आले नसून तरी देखील सुद्धा ते एक मिशन व सेवा म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना स्फूर्ती किंवा शाबासकीची थाप देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलेले हे बेताल वक्तव्य लज्जास्पद व अपमानजनक आहे. असेही निवेदनात नमूद आहे.

या निवेदनाद्वारे भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सर्व पदाधिकारी डॉक्टर्स यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र जाहीर निषेध करीत त्यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील डॉक्टरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.
यावेळी डॉ. संजय पूरी, भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश समन्वयक डॉ. स्वप्नील बी. मंत्री, डॉ. प्रमोद आकात, डॉ. कल्याण बोनगे, डॉ. भानूदास कदम, डॉ. योगेश कदम व अन्य डॉक्टर्स उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक