भोकरदन तालुका

सम्राट अशोक शिक्षण संस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा संपन्न

मधुकर सहाने : भोकरदन

सम्राट अशोक शिक्षण संस्था भोकरदन जिल्हा जालना संचलित शाळांनी शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० च्या परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत दीप भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडोद तांगडा निकाल १०० टक्के, दीप भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दानापूर निकाल ९७.३६ टक्के दिपभारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,माहोरा निकाल ९६.७७ व लुंबिनी विद्यालय कुंभारझरी निकाल ९३.७५ यश संपादन केले तर यामध्ये संस्थेच्या सर्व शाळांमधून दीप भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दानापूर चे गुणवंत विद्यार्थी प्रथम क्रमांक कुमारी साक्षी निर्मळ (90.60.), द्वितीय क्रमांक राजू शहा(89.80) तृतीय क्रमांक शिवानी वरपे89.40) गुण संपादन केले.
पण संस्थेने संस्थेच्या सर्व शाळांमधून प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना कालकथित मातोश्री राऊबाई सांडुजी सदाशिवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गौरव प्रमाणपत्र व रोख रक्कम पारितोषिक म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुदामराव सांडुजी सदाशिवे व सचिव दीपक सुदामराव सदाशिवे यांचे शुभहस्ते माहोरा या शाळेत देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुदामराव सांडुजी सदाशिवे व प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव दीपक सुदामराव सदाशिवे यांनी प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.


कार्यक्रमास संबोधित करताना स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या अंगी जिद्द असायला हवी तसेच स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही असे सुदामराव सदाशिवे यांनी प्रतिपादन केले तसेच संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात जाऊन आपल्या संस्थेच्या शाळेचे नाव उज्वल केले पाहिजे अशी तयारी करून मार्गदर्शन करावे असे शिक्षक वृंद यांना सुचविले पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास संस्थेचे सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते सूत्रसंचालन पवार यांनी केले तर पांडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक