भोकरदन तालुका

भोकरदन जाफराबाद पुल बनला धोकादायक,नगर पालिकेने लावले सुचना फलक

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन जाफराबाद रोडवरील फुलाची अत्यंत दयनिय आवस्था झाली असुन,हा मेन रहदारीचा पुल असल्याने जड वाहनांनी या पुलावरुन जावु नाही असे नगर पालिकेने पुलावर सुचना फलक लावले आहे.

भोकरदन जाफराबाद रोडवरील शहरालगत असलेल्या केळना नदीवरील पुलाचे मर्यादा संपली असुन नागरीकांनी अनेक वेळा नविन पुलाची मागणी करुनही या पुलाचे काम झाले नाही,आणि गेल्या आठ दिवसापासुन सलगच्या पाऊसामुळे या पुलाला मोठ मोठी गड्डे पडली असुन साईटचे कठडे ही तुटले असल्याने या पुलाने आता धोक्याची मर्यादा ओलांडली असुन हा पुल कधीही तुटु शकतो,या पुलावर जड वाहने नेवु नये असे भोकरदन नगर पालिकेच्या वतीने सुचना फलक या फुलावर लावण्यात आले असुन भोकरदन वासीयांनी काळजी घ्यावी व बांधकाम विभागाने तातडीने या पुलाची डागडुजी करावी व पाऊसाळा संपल्यावर नविन पुलाचे काम चालु करावे अशी मागणी भोकरदन वाशीयातुन व वाहन चालकातुन जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक