परतूर तालुका

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना लोणीकर यांचे पत्र

दीपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क दि १९
मराठवाडासह संपूर्ण महाराष्ट्रात अगोदरच शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणे कंपनी आणि महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले परिणामी शेतकऱ्यांना एकदा-दोनदा तर काही ठिकाणी तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली आहे असे असताना खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुन्हा एकदा शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांनी या हंगामात घेतली जाणारी कापूस मूग उडीद सोयाबीन मका मिरची यासारखे अनेक पिके नष्ट झाली आहेत अतिवृष्टीमुळे कापसाला आलेली फुले व कार्य पूर्णतः गळून पडले असून कापसाच्या उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येणार आहे त्याचबरोबर मूग या पिकाच्या शेंगा पूर्णपणे सडून गेल्या असून काही शेंगांना झाडावरच कोम फुटलेले आहेत हीच अवस्था उडीद सोयाबीन मका या पिकांची देखील झालेली आपणास दिसून येईल मक्याचे पीक देखील पूर्णपणे भुईसपाट झालेले आहे.


या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवा अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक