जालना जिल्हा

जालनात फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे छायाचिञकार दिन साजरा.

चांगले दिवस येतील खचून न जाता व्यवसाय करा : माजी मंत्री अर्जुनराव खोतकर

जालना न्यूज ब्युरो दि १९: कोरोना संसर्गामुळे संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत झाले असून सुख – दु:खांचे क्षण, निसर्गातील सौंदर्य हेरून मानवाचे सोबती असलेला छायाचित्र व्यवसाय अडचणीत सापडला आहे. तरी सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल. हे दिवस ही निघून जातील. खचून न जाता छायाचिञकारांनी व्यवसाय करावा असा आशावाद माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी आज येथे छायाचित्रकारांना दिला.


जागतिक छायाचित्र कार दिनानिमित्त बुधवारी ( ता. १९) जालना जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे भाग्यनगर येथील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या दर्शना निवासस्थानी छोटेखानी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाजार समिती चे माजी उपसभापती रामेश्वरराव भांदरगे पाटील, फोटो ग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष अनिल व्यवहारे, जेष्ठ छायाचित्र कार नरसिंग सरगम, माजी अध्यक्ष राजेश खर्डेकर, शासकीय छायाचित्र कार अनिल परदेशी, नागेश बेनीवाल, सोनाजी नन्नवरे, अमित काळे, लक्ष्मीकांत नारळे, गौतम वाघमारे, निलेश बोरसे, ऋषी केष शिंदे यांची उपस्थिती होती.


माजी मंत्री अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान विकसित झाले, मोबाईल च्या फोटो ग्राफीचे आव्हान उभे राहिले तरीही विविध प्रसंगात नेमके पणा हेरून सौंदर्य शोधण्याची कला ही फक्त छायाचित्र कारांत असल्याने कितीही आव्हाने आली तरी छायाचित्र कारांचे स्थान अबाधित राहणार आहे. असे सांगून कठीण काळात संयम बाळगा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक अपडेट व्हा येणारा उज्वल काळ तुमचाच आहे. असा आशावाद माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.
फोटो ग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष अनिल व्यवहारे यांनी कोरोना संसर्गजन्य काळात जोखीम पत्करून छायाचित्र कार व्यवसाय करत असले तरीही शारीरिक अंतर ठेवून सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत छायाचित्र कारांनी व्यवसाय करावा. असे आवाहन अनिल व्यवहारे यांनी केले.


रामेश्वर राव भांदरगे यांनी ही यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते कॅमेरा पुजन करण्यात आले.सुञसंचालन आशीष रसाळ यांनी केले तर नागेश बेनीवाल यांनी आभार मानले.


जागा मिळवा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू..!
जालना शहरात छायाचित्र कारांसाठी आर्ट गॅलरी उभारण्यात यावी ही अनेक वर्षांपासून मागणी असून राज्य शासनाने या कामी मदत करावी अशी मागणी फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष अनिल व्यवहारे यांनी केली.नगरपरिषदेकडून जागा मिळवा संवेदनशील छायाचित्र कार असलेले शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे पाठपुरावा करून आर्ट गॅलरी साठी अनुदान मिळवून दिले जाईल. अशी ग्वाही माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक