जालना जिल्हा

सततधार चार दिवसांपासून सुरूच , पावसामुळे कपाशी पिक धोक्यात

सिंधीकाळेगाव (शाम गिराम ) दि १९ जालना तालुक्यातील राममुर्ती येथील पाच सहा दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे शेतकर्यांचे फार नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिके पिवळे पडत असल्याने शेचकर्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कारण सारखा पाऊस पडत असल्याने शेतातील कामे बंद पडली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संततधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पिके नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्यापासून ज्याप्रमाणे पाऊस पडत होता त्यानुसार शेतकरी वर्गास चांगले उत्पादन होईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती,परंतु गेल्या आवडाभरापासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे कपाशी पिकांसह अन्य पिके नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जालना तालुक्यातील राममुर्ती येथील संदीप मगर याच्यां शेतामध्ये कपाशी पिकामध्ये पाणी साचले आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे कपाशी, मुग, मका, अशी पिकांची नासाडी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक